MNS Mira Bhayandar Morcha Maharahtra LIVE: आई वडिलांप्रमाणेच मराठी, हिंदी भाषेचे महत्व- किरीट सोमय्या
MNS Mira Bhayandar Mumbai Morcha LIVE : मनसेकडून मीरा रोड स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात येत असून सर्वसामान्य लोकंही या मोर्चात मराठीसाठी सहभागी झाले आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

MNS Mira Bhayandar Morcha Mumbai Maharahtra LIVE: यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनासाठी 22 तास खुले राहणारा आहे. वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी माहिती दिली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट मध्ये येतात, मात्र यापूर्वी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे, मात्र यंदाच्या वर्षी स्वामीभक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहे. यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांसाठी देवस्थाकडून मोठ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण , मध्य महाराष्ट्रत १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाडा आणि विदर्भात ९ जुलैनंतर पावसाचा जोर कमी होणार. पुर्व भारतात मुसळधार पाऊस होणार आहे त्याचा परिणाम हा आपल्या राज्यात पाहायला मिळेल. राज्यातील ८६ हजार वीज कामगार , अभियंते, अधिकारी विविध मागण्यासाठी संपावर जाणार आहेत. १ दिवसाच्या संपावर वीज कामगार जाणार. महावितरण, महापारेषण, आणि महानिर्मिती या तीन कंपन्यांचा खाजगीकरणाचा सरकारने घाट घातल्याचा आरोप… आज रात्रीपासून एक दिवस जाणार कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
अमरावतीत 6 तलवारी, 11 चाकू आणि एका कोयत्यासह दोघांना अटक
अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रमुख संदीप चव्हाण यांनी गवळीपुरा भागात सराईत गुन्हेगाराच्या घरावर कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी 6 तलवारी, 11 चाकू व 1 कोयता हस्तगत केला असून, दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
-
रायगड: परप्रांतीय दुकानदाराची मनसे कार्यकर्त्यांनी धरली कॉलर
अलिबाग मध्ये अलिबाग बाजारच्या मालकाने आपल्या वॉट्स अप स्टेटसवर मराठी माणसाला डीवचण्यासारखा मेसेज शेअर केला होता. यानंतर अलिबाग मधील मनसे सैनिकांनी थेट अलिबाग बाजारामध्ये त्याची कॉलर धरत त्याला जाब विचारला.
-
-
ख्रिश्चन धर्मांतराचा बळी, जस्टीस फॉर ऋतुजा
सांगली शहरातील यशवंतनगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे या उच्चशिक्षित विवाहित महिलेने सासरच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या जाचाला कंटाळून सात महिन्याचा गरोदरपणात आपले जीवन संपवले. या घटनेच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर, धीरज घाटे, संग्राम भंडारे याच्या उपस्थित निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारने ताबडतोब धर्मांतर बंदी कायदा लागू करावा आणि राजगे कुटुंबाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली.
-
आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन
मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. शिक्षकांच्या पूर्ण वेतनाच्या हक्कासाठी हंकार आंदोलन करण्यात येत आहे. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाचे अनुपालन करावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
-
होमिओपॅथिक डॉक्टरांना MBBS डॉक्टरांकडून होतोय विरोध, कारण काय?
लातूर – होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करायला MBBS डॉक्टरांनी विरोध दर्शविला आहे, यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो असे MBBS डॉक्टरांचे म्हणणे आहे. होमिओपॅथी पदवी नंतर सहा महिन्यांचा कोर्स करणाऱ्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.त्या नंतर आता MBBS डॉक्टर पुढे येऊन या बाबीचा विरोध करीत आहेत. -
-
आई वडिलांप्रमाणेच मराठी, हिंदी भाषेचे महत्व- किरीट सोमय्या
आई वडिलांप्रमाणेच मराठी हिंदी भाषेचे महत्व…भाजप नेते किरीट सोमय्या यांचे मालेगाव दौऱ्यावर भाष्य…मराठी महाराष्ट्राची राज्य भाषा म्हणून महत्त्व…भाषा त्रिसूत्री हिंदी महत्वाचीच : किरीट सोमय्या… -
गडचिरोली- देसाईगंज नगरपरिषदेचा निष्काळजीपणा, पुलावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
गडचिरोली- देसाईगंज नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे तयार करण्यात आलेला कोट्यावधी रुपयांच्या पुलावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेया शहरात रेल्वे मार्ग असल्यामुळे नागरिकांनी रेल्वे लाईन ओलांडून जाऊ नये यासाठी जमीनाखाली पुलाची निर्मिती करण्यात आलीपरंतु जवळपास चार-पाच वर्षापासून या पुलाच्या मुख्य मार्गावर नेहमीच पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहेपाणी साचलेल्या पुलावर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला -
लखनौनंतर आता अलीगढमध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना
लखनऊनंतर आता अलीगढमध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना पकडण्यात आला आहे. यूपी एसटीएफने अलीगढमध्ये एका बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.
-
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळत नसल्याने विरोधक आक्रमक
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळत नसल्याने विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांची इतकी भीती का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. राज्यात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
-
आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
सुरेश धस यांच्या मुलगा सागर धस याच्या चारचाकीची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वास नितीन शेळके यांचा मृत्यू झाला आहे. रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास अपघात झाला असून सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
-
पंजाब: कॅशलेस आरोग्य विम्याची घोषणा, वार्षिक 10 लाख रुपयांचा विमा उपलब्ध असेल
पंजाबमध्ये नवीन कॅशलेस आरोग्य विम्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 10 लाख रुपयांचा विमा दिला जाईल. अशाप्रकारे, पंजाब 10 लाख रुपयांचा वार्षिक विमा देणारे पहिले राज्य बनले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील 65 लाख कुटुंबांसाठी कॅशलेस विमा योजनेची घोषणा केली.
-
पिंपरी- चिंचवड येथे शाळेत नवीतल्या विद्यार्थ्यांचा मित्रावर शस्राने हल्ला
पिंपरी- चिंचवड येथील पिंपळे सौदागर परिसरातील नामांकित स्कूलमध्ये नववीतल्या मुलावर त्याच्याच वर्गातील मुलाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे
-
कोथरुड येथे खिडकीतून पडणाऱ्या मुलीला जवानाने वाचवले
कोथरूड अग्निशमन केंद्रातील रजेवर असलेल्या जवान योगेश चव्हाण याने लहान बाळाला खिडकीतून पडताना वाचवले आहे. खोपडेनगर येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर घर बंद असताना एक छोटी मुलगी खिडकीतून पडण्याच्या स्थितीत होती. त्यावेळी चव्हाण याने तातडीने या मुलीला वाचवले.
-
हा विधानमंडळ नाही तर महाराष्ट्राच्या १२ कोटी लोकांनी केलाला सत्कार आहे – सरन्यायाधीश भूषण गवई
हा माझा शेवटचा सत्कार आहे. हा केवळ विधानमंडळ नाही तर महाराष्ट्राच्या १२ कोटी लोकांनी केलाला सत्कार आहे असे सरन्यायाधीश भुषण गवई यांनी म्हटले आहे.
-
महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जेजुरी गडावर वृक्षारोपण
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या परिसरामध्ये वड, पिंपळ, चिंच, शिसम, करंज, बहावा, औदुंबर, आपटा, कांचन, कडुलिंब, जांभूळ, आवळा अशा विविध प्रकारची जंगली,फळझाडे तसेच आयुर्वेदिक वनौषधी असे मिळून एकूण 550 झाडांची रोपे लावण्यात आली. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री,महाराष्ट्र भूषण डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
-
हिंमत असेल तर बॉलिवूडला चित्रपट बनवण्यापासून थांबवावे; जगतगुरू शंकराचार्य स्वामींचा स्पष्ट वक्तव्य
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि येथे अनेक विद्वान झाले आहेत ज्यांनी खूप चांगल्या शिकवणी देऊन स्वतःला देवाला समर्पित केले आहे. शंकराचार्य म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे हे मेल अमेल आहे. ते जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. आपण हिंदी भाषा कशी थांबवू शकतो? आज मुंबईत बॉलीवूड आहे आणि महाराष्ट्रातील लोक बॉलीवूडच्या कमाईवर जगतात. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बॉलिवूडला चित्रपट बनवण्यापासून थांबवावे आणि मराठी चित्रपट बनवायला सुरुवात करावी असे जगतगुरू शंकराचार्य स्वामी यांनी म्हटले आहे.
-
विधिमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा
विधिमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा पार पडत आहे. 13 कोटी जनतेच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला आहे.
-
धुळे जिल्ह्यात मुसळदार पावसाने पाणीसाठ्यात प्रचंड वाढ
आठवडाभरात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. बारा मध्यम प्रकल्पामध्ये 51% जलसाठा दर लघु प्रकल्पांमध्ये सत्तावीस टक्के जलसाठा साठला आहे. साखरी तालुक्यातील जामखेड,मालनगाव, पांजरा धरण 100% भरले आहेत. अक्कलपाडा धरणात 71 टक्के जलसाठा आहे.
-
आमच्या नादाला लागू नका, अशीच एकजूट मराठी माणसासाठी दाखवू: अविनाश जाधव
अविनाश जाधव देखील मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यांनी अटकेबद्दल आणि नक्की कशामुळे अटक करण्यात आली होती याबद्दल सांगितलं. तसेच त्यांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, “आता वाद नको ,आम्हाल एकत्र राहायचं आहे. मराठी , महाराष्ट्रासाठी आम्ही कायम एकत्र राहणार. आमच्या नादाला लागू नका अशीच एकजूट मराठी माणसासाठी दाखवूया” असंही ते म्हणाले.
-
मीरा रोड रेल्वे स्थानकात मोर्चासाठी तुफान गर्दी
मनसे आणि ठाकरे सेनेने मराठीसाठी मोर्चा काढला आहे. मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकात मोर्चाला प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
-
सरनाईकांना चपलेनं मारलं पाहिजे होतं: राजन विचारे
‘सरनाईकांना चपलेनं मारलं पाहिजे होतं. मोर्चाला परवानगी दिली असती तर काय बिघडलं असतं. त्यांनी आधी राजीनामा द्या” अशा भावना व्यक्त करत राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
-
MNS Morcha Mira Bhayander : सर्वप्रथम मी मराठी आहे, मंत्री आणि आमदार नंतर – प्रताप सरनाईक
सर्वप्रथम मी मराठी आहे, मंत्री आणि आमदार नंतर, मराठी म्हणून माझी भूमिका कायम राहणार आहे. मंत्रीपद औटघटकेचं असतं, मराठी मी शेवटपर्यंत राहणार आहे, अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली.
-
मराठी माणूस एकवटला याचा आनंद आहे – अविनाश जाधव
मराठी माणूस एकवटला याचा आनंद आहे. हा मराठी माणसाचा आणि त्यांच्या एकीचा विजय आहे अशी भावना अविनाश जाधव यांनी व्यक्त केली.
-
अविनाश जाधव यांना सोडत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार – मनसेची भूमिका
मनसे नेते अविनाश जाधव यांना जोपर्यंत पोलिस सोडत नाही तोपर्यंत मोर्चा असाच चालू राहणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
-
मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी
मीरा रोडमध्ये मराठी भाषेसाठी व्यापक मोर्चा काढण्यात आला असून मनसे, शिवसेना ठाकरे गट, मराठी एकीकरण समितीचे हजारो कार्यकर्त त्यात उपस्थित आहे. राज्यातील मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत.
-
संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ट्रेनने मीरा रोडच्या दिशेने रवाना
मराठीच्या मुद्यावरून मनसेने काढलेल्या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सामान्य नागरिकांसह मनसे, शिवसेना ठाकरे गट, मराठी एकीकरण समितीचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले असून सध्या हा मोर्चा मीरा रोड स्थानकाजवळ आलेला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत.
-
सर्वांना मराठी भाषा आलीच पाहिजे – मोर्चात सहभागी लहान मुलाचेही आवाहन
एक मराठा लाख मराठा, या राज्यात सर्वांना मराठी आलीच पाहिजे, त्यासाठी आजचा मोर्चा काढला आहे, मीरा-भाईंदर येथील मोर्चात सहभागी झालेल्या चिमुकल्याने दिली मराठीसाठी हाक.
-
पोलिस आणि प्रशासन हे महाराष्ट्रात मराठी माणसाचं काहीही वाकडं करू शकत नाहीत – अभिजीत पानसे
पोलिस आणि प्रशासन हे महाराष्ट्रात मराठी माणसाचं काहीही वाकडं करू शकत नाहीत असं मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले. मराठीची, मराठी माणसांची जी एकजूट झाली त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. मराठीला कसं खाली पाडता येईल याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे अशी टीका पानसे यांनी केली आहे.
-
खेडमध्ये मनसेचे आंदोलन
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आणि सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अविनाश जाधव यांना तत्काळ सोडा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.
-
मनसेचा मीरा रोडवर मोर्चा
मनसेने सुरुवातीला मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर आता ठिकठिकाणांहून मनसे कार्यकर्ते मीरा-भाईंदरकडे निघाले आहेत. मीरा रोडमधये मनसेचा मोर्चा निघाला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे हे मोर्चात सहभागी झाले आहेत.
-
अबू आझमींची मनसेवर टीका
मनसेच्या लोकांनी कायद्यांच्या मजाक केला आहे. या आधी टॅक्सी वाल्यानं मारले हत्या झाल्या. मीरा रोडवर दुकानदारला मारले. दुकानदारांनी आंदोलन केले. मनसेचे आंदोलन अनधिकृत आहे. न्यायाधीश येत आहे ते काय म्हणतील काय मजाक लावली आहे, अशी टीका अबू आझमींनी केली आहे.
-
गोंदियात होत असलेल्या पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर
गोंदिया जिल्ह्यात रात्री पासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत असल्याने अनेक भाग सखोल भागातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळेच अनेक भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 21 मार्ग बंद झाले आहेत. मोरगाव तालुक्यातील 10, देवरी तालुक्यातील 10 आणि गोंदिया तालुक्यातील 1 पावसामुळे मार्ग बंद झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
-
केडियाचे कार्यालय फोडणारे मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही असे म्हणणाऱ्या उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस फोडणारे मनसैनिक राज याच्या भेटीला शिवतीर्थावर आले आहेत. तोडफोड करण्यामध्ये सहभागी असलेले मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत मनसे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भेटीला आले आहेत.थोड्या वेळात राज ठाकरे या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
-
मीरा-भाईंदरच्या मोर्चात मंत्रीच सहभागी होणार
शिंदेंचे शिलेदार मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी होणार आहे, अशी माहिती त्यांनीच दिली आहे. ही पोलिसांची दादागिरी असल्याचे म्हणत पोलिसांनी मला अटक करून दाखवावी असे आवाहन मंत्री महोदयांनी दिले आहे.
-
आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड
मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. तर अनेक चाकरमानी सुद्धा येथे जमा झाले आहेत. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड होत आहे. मनसे कार्यकर्ते आता ठिकठिकाणांहून मोर्चासाठी निघाले आहेत. त्यामुळे या भागात दिवसभर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
-
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी
नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्याने पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची मोठी गर्दी. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि बँकेमध्ये महिलांची गर्दी होत आहे. राज्य शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून पंधराशे रुपये दिले जात असतात.
-
संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला
संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर आले भेटायला. मिरा रोडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती.
-
आजच्या मोर्चाचा हेतू योग्य नव्हता – नरेंद्र मेहता
“पोलिसांनी योग्य कारवाई केली असेल. आजच्या मोर्चाचा हेतू योग्य नव्हता. अमराठी लोकांच्या मोर्चाचा हेतू चांगला होता” असं मीरारोड-भाईंदरचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता म्हणाले.
-
उद्योजक सुशील केडियांच्या कार्यालयाची तोडफोन करणारे मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही, असं म्हणणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड करणारे मनसैनिक आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या तोडफोड प्रकरणात सहभागी असलेले मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत या सेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. थोड्याच वेळात राज ठाकरे या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या या संघर्षात, मनसेने घेतलेली ही भूमिका आणि त्यानंतर राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांसोबतची ही भेट लक्षवेधी ठरली आहे.
-
मीरा भाईंदरमध्ये पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
मीरा भाईंदरमध्ये पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमराठी मोर्चाला परवागी, आम्हाला का नाही, असा सवाल मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
-
निशिकांत दुबे खोटी पदवी घेऊन संसदेत बसले, संजय राऊतांचा आरोप
निशिकांत दुबे खोटी पदवी घेऊन संसदेत बसले आहेत. हा मुंबईच्या दलालीवर जगत आहे. त्याची दलाली कमी होईल. शिवसेना आणि मनसेने एकाही परप्रांतीयाला मारहाण केलेली नाही. आम्ही फक्त मराठी बोलत आहोत, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले.
-
नाशिकमधील ७ धरणे पूर्ण भरली
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या गंगापूर धरणातून ६३३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे अंदाजे २० टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील २३ पैकी ७ धरणे १०० टक्के भरली आहे. यामध्ये भावली, भाम, हरणबारी, वालदेवी, आळंदी, भोजपूर आणि केळझर या धरणांचा समावेश आहे.
-
श्वानामुळे एकाचा मृत्यू
भटका श्वान अंगावर धावून आल्याने बचावासाठी बिल्डिंगवर चढलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा खाली पडून मृत्यू झाला आहे. नागपूरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील पवनगाव येथे ही घटना घडली. जयेश बोकडे असे त्या मुलाचे नाव आहे.
-
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज सत्कार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार आज विधीमंडळात होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी विधिमंडळाकडून करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताचे मोठे बॅनर विधानभवनच्या परिसरात लावण्यात आले आहेत.
-
गोंदियामधील दोन मार्ग बंद
सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला ते दासगाव व देवरी तालुक्यातील चिचगड ते देवरी हे 2 मार्ग बंद झाले आहेत.
-
जालना जिल्ह्यात दोन दिवसापासून रिमझिम पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा
जालना जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने कालपासून जिल्ह्याच्या विविध भागात रिमझिम पाऊस होत आहे. केवळ ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस असल्याने शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या एक महिनाभरापासून अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
-
शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी…
उत्सावादरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता… संभाव्य गर्दी लक्षात घेता उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरूवारी मंदिर रात्रभर दर्शनासाठी राहणार खुले.. गुरूवार रात्रीची आणि शुक्रवार पहाटेची काकड आरती रद्द… व्हिआयपी ब्रेक दर्शन दिवसभर असणार बंद… उत्सवादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
-
वसई विरार मधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहाटे तीन वाजता पोलिसांनी घरातून उचलले
भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार मधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु.. पालघर लोकसभा अध्यक्ष जयंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वसई, विरार, नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे… महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू असल्याच्या भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत
Published On - Jul 08,2025 8:26 AM
