ED Raid In Mumbai : ईडीकडून मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरू, काय आहे प्रकरण?
Mithi River Scam : ईडीकडून मुंबईत विविध ठिकाणी सकाळपासूनच छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आधीपासूनच तपास सुरू आहे. या प्रकरणात एकूण 13 जणांना आरोपी करण्यात आलेलं आहे. त्यापैकी आरोपी केतन कदम आणि जय जोशी हे अटकेत होते. जय जोशी याला कालच कोर्टाने जमीन दिलेला आहे. विशेष म्हणजे बीएमसीचे काही अधिकारी सुद्धा यात आरोपी आहेत. आता आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाच्या आधारावरतीच मुंबईतल्या ईडीने सुद्धा मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच ईडीची वेगवगेली पथकं ही मुंबईतल्या अनेक ठिकाणी छापेमारी करत आहेत. बीएमसीचे कंत्राटदार अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित देखील काही ठिकाणी छापेमारी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

