Amol Mitkari : कर्णधारांनी संभ्रम निर्माण करू नये; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची नाराजी
Amol Mitkari On Cm Fadnavis statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीतील विधानावर आमदार अमोल मिकटकरी यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधारांनी संभ्रम निर्माण करू नये, असं अमोल मिटकरी यांनी म्हंटलं आहे. 4 भिंतींच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित आहे, असंही मिटकरी म्हणालेत. एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संवादात चांगले नाहीत असं या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी याबद्दल ट्विट देखील केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली असून संवादासंदर्भातील गोष्टी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते, असं मिटकरी म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कमी पडत असल्याबद्दल जे वाटतं ते साफ चुकीचं आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा संवाद मुख्यमंत्र्यांसोबत देखील आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत देखील आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

