Satish Bhosale : सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत खोक्याची रवानगी
Satish Bhosale In Judicial Custody : सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कोठडीत वाढ झाली आहे. आज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणी त्याला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज खोक्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर दुसरीकडे बॅटने केलेल्या मारहाण प्रकरणात पोलीस उद्या पुन्हा खोक्याच्या अटकेची मागणी करू शकतात.
खोक्या भोसले हा आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने मारहाणी बरोबरच हरणांची शिकार केल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. त्याचे काही पैसे उडवतानाचे व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कारवाई केली.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
