Pune Vasant More On Hanuman Mahaarti | कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर; वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्या पक्षातली मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेकडून त्यांच्यावर टीका सहन करावी लागली होती.
पुणेः राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, हिंदुत्वचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. हा मुद्दा चालू असतानाच पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावरुनही हे भोंगा प्रकरण अधिकच चर्चेले गेले. त्यानंतर आता पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला (Katraj Mahararati) मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर राहिले. या कार्यक्रमात राज ठाकरे गैरहजर राहिल्याने वसंत मोरे यांनी जाहीर भुमिका या लढाईत सेनापतीच कुठे दिसले नाहीत असं म्हटलं आहे. तर आझाद मैदानात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्या पक्षातली मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेकडून त्यांच्यावर टीका सहन करावी लागली होती. या टीकानाट्य नंतर खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर राहिले.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?

