Marathi News Videos MNS leader Vasant More future MP While the Lok Sabha election has not been announced, MNS banner in Pune

मनसे नेते वसंत मोरे भावी खासदार, पुण्यात मनसेकडून जोरदार बॅनरबाजी
VIDEO | पुण्यात भावी खासदाराच्या स्पर्धेत मनसेची उडी, वसंत मोरे यांचे झळकले बॅनर
पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवर आता कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवर अनेक इच्छुकांनी दावा केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर झळकले होते. पुण्यातील वडगाव भागात हे बॅनर लावण्यात आले होते. तसेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे. आता मनसेकडून वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर्स लागले आहे.राज ठाकेर यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून केला आहे.
Published on: Jun 13, 2023 2:55 PM
Related Video
एशियन गेम्स स्पर्धेतून टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा पत्ता कट, कारण?
पाचवी नापास... UPSC परीक्षेत 3 वेळा अपयश, चौथ्या प्रयत्नात बनली IAS
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
रजनीकांत यांच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले बजेट, कमाई..
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत