AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'साहेब मला माफ करा...', वसंत मोरे यांचा 'मनसे'ला अखेरचा जय महाराष्ट्र, FB पोस्ट करत म्हणाले...

‘साहेब मला माफ करा…’, वसंत मोरे यांचा ‘मनसे’ला अखेरचा जय महाराष्ट्र, FB पोस्ट करत म्हणाले…

| Updated on: Mar 12, 2024 | 1:44 PM
Share

मनसे नेते वसंत मोरे यांनी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त केली होती आणि थेट राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई, १२ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त केली होती आणि थेट राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …, असं त्यांनी म्हटलं आहे. तर ‘पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती.’, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी मनसेला राजीनामा दिला आहे.

Published on: Mar 12, 2024 01:44 PM