Mumbai | मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच ‘प्रतिक्षा’, मनसेची अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पोस्टरबाजी

अमिताभ बच्चन यांचा जुहू चौपाटी या ठिकाणी असलेला प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेर मनसेने पोस्टरबाजी केली आहे. अमिताभ बच्चन यांचा जुहू चौपाटी या ठिकाणी असलेला प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांनी प्रतिक्षा बंगल्यावर पोस्टरबाजी केली आहे. (MNS Poster in front of Amitabh Bachchan Pratiksha bungalow)

मनसेने प्रतिक्षा बंगल्यासमोर काही बॅनर लावले आहेत. त्यात त्यांनी बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, असा मजकूर लिहिला आहे. अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, अशी पोस्टरबाजी मनसेने केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI