Raj Thackeray : देशात माणसाला किंमत नाही, मुंबईत एकही दिवस असा नाही की… राज ठाकरेंनी सरकारलं फटकारलं
कसारा सीएसएमटी लोकल ट्रेन अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आज सकाळी मुंबईत घडलेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेत ८ प्रवाशांचा जीव गेला आहे. या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर चांगलंच घेरलंय. ते म्हणाले, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा कशासाठी द्यावा, अपघात घडतात तिथे जावं, त्यांनी बघावं. नसेल तर सुधारणा करावी. एकदा मुंबई लोकलमधून प्रवास करुन बघा, जर लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरुन मरतील इतकी गर्दी असते. त्याची एक जागा बाहेर येण्यासाठी हवी आणि एक जागा आत येण्यासाठी हवी. आपल्या देशात माणसाची किंमतच नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी ट्रेन दुर्घटनेवरुन सरकारला धारेवर धरलंय.
तर पुढे ते असेही म्हणाले, मुंबईतील गर्दी नवी नाही. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाहीत. उंच इमारती उभारल्या जातायत. रस्ते नसल्याने पार्किंग नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्राफिक अडलं जाते. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या अनेक ठिकाणी ही समस्या आहे. कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही. अशी आपल्या शहराची अवस्था आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच आपल्याकडे नाही असं म्हणत राज ठाकरेंनी फटकारलंय.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

