नरेंद्र मोदी विरोधामुळं ‘मविआ’ला मतदान, राज ठाकरे यांना नेमकं म्हणायचं तरी काय?
महाविकास आघाडीला जे मतदान ते मोदींविरोधात झालेलं मतदान आहे. ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्याविरोधात महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं. बघा स्पेशल रिपोर्ट...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदावर निवड झाली. याच बैठकीतून राज ठाकरे हे मविआ, उद्धव ठाकरे आणि मोदींबद्दल सूचक बोलले. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केले आहे. महाविकास आघाडीला जे मतदान ते मोदींविरोधात झालेलं मतदान आहे. ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्याविरोधात महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं. तर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याने लोकांना ते पटलं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणाही साधला आहे. यासह उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असणाऱ्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांना आणू नका, कारण त्यांचा महाराष्ट्रात मोठा वर्ग आजही आहे, असं स्पष्टपणेही राज ठाकरे यांनी म्हटलं. बघा स्पेशल रिपोर्ट…
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

