MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू….

MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू….

| Updated on: Oct 14, 2026 | 1:46 PM

मनसेने ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सेल्फी विथ ज्ञानू ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर सुरू झालेल्या या मोहिमेनंतर मतदार यादीतील त्रुटींवर मनसे न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ज्यांची नावे वगळली त्यांना नवीन मतदारांसाठी असलेला फॉर्म ६ भरायला सांगण्यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. स्वाक्षरी मोहिमेनंतर आता मनसेने सेल्फी विथ ज्ञानू ही नवीन मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर ही सेल्फी विथ ज्ञानू मोहीम सुरू झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, या मोहिमेद्वारे नागरिक ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आपल्या भावना व्यक्त करतील.

या आंदोलनासोबतच मनसेने या प्रकरणावर कायदेशीर लढा देण्याची तयारी केली आहे. मनसेच्या वकिलांशी चर्चा झाली असून, लवकरच या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. मनसेची मुख्य मागणी ही आहे की, ज्या मतदारांची नावे सुरुवातीला एसआर ड्राफ्टमधून वगळण्यात आली आहेत, त्यांना नवीन मतदारांसाठी असलेला फॉर्म सहा भरण्यास सांगितले जात आहे. मनसेचा प्रश्न आहे की, जर आमचे नाव आधीच मतदार यादीत असेल, तर आम्ही चुकीचा फॉर्म का भरावा. या एका केसचा निकाल जरी लागला तरी तो ओव्हरऑल सगळ्यांना लागू होईल, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.

Published on: Oct 14, 2026 1:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us