Prakash Mahajan : ठाकरे बंधूंच्या युतीवरून मनसेत मतभेद; प्रकाश महाजन यांचं मोठं वक्तव्य
Prakash Mahajan On Thackeray Brothers Reunion : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच यावर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.
ठाकरेसेनेसोबतच्या युतीसाठी मनसेमध्येच मतभेद आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आले नाही तर मराठी माणूस हताश होईल अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे. तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्याकडून उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर निशाणा साधण्यात आला आहे. राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.
यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, अनिल देसाई असतील, अनिल परब असतील किंवा खुद्द संजय राऊत असतील, तुम्ही कधी गेलात का राज ठाकरेंकडे? ज्या माणसाचं मन एवढं उदार आहे की तो शत्रूलासुद्धा आदराने वागवतो, त्याच्यासमोर तुम्ही कधी योग्य प्रस्ताव ठेवला का? यामुळे दोन्ही पक्षांतला सामान्य कार्यकर्ता व्यथित आहे. इतिहास या सगळ्या गोष्टींची नोंद घेईल, अशी खंत यावेळी प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

