मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000…
भारतातील तरुण पिढी लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या विषयांमध्ये सक्रिय होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईत तरुणांशी संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात Gen Z आणि Gen Alpha विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

IIMUN च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात हे विशेष सत्र होणार आहे. 2011 मध्ये ऋषभ शाह यांनी सुरू केलेले IIMUN तरुणांना भारताची ओळख जगभर पोहोचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.
गेल्या 15 वर्षांपासून 15 ते 24 वयोगटातील तरुण या संस्थेचे कामकाज सांभाळत आहेत. या मंचातून अनेक तरुण पुढे लोकप्रतिनिधी, IAS, IPS अधिकारी, वकील, लेखक आणि उद्योगपती झाले आहेत. यंदा मुंबईत अंदाजे 2000 तरुण-तरुणी सहभागी होणार आहेत.
IIMUN च्या सल्लागार मंडळात अजय पिरामल, दीपक पारेख, नादिर गोदरेज, डॉ. शशी थरूर, डी. वाय. चंद्रचूड, करण जोहर आणि पी. टी. उषा यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.