Sambhajinagar News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
Kranti Chowk Student Protest : संभाजीनगर येथे आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजीने आंदोलन परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात विद्यार्थ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.
राज्य सेवा आयोगाची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात याव्यात तसंच कंबाईन – 2024 (पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर)च्या जागा वाढवण्यात याव्यात या मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी

