Mumbai Rain | चेंबूर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळली; तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Heavy Rain wall collapsed Landslide at three different place 18 death)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI