AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी! मुंबईत पावसाला मुसळधार सुरुवात

विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी! मुंबईत पावसाला मुसळधार सुरुवात

| Updated on: Jul 21, 2025 | 9:29 AM
Share

मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक बघायला मिळत आहे. गोरेगाव, अंधेरी, सांताक्रूझ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यासह नवी मुंबईत देखील काही ठिकाणी मध्य रात्रीपासूनच जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील 2 ते 3 दिवस अशाच मुसळधार पावसाची शक्यता हवणात खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही या भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचे प्रमाण कमी झाले असले, तरी दमट हवामान आणि वाढता उकाडा नागरिकांना अस्वस्थ करत आहे. ढगाळ वातावरणामुळे ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. काल मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. तर आज सकाळपासून आकाश ढगांनी आच्छादलेले असून काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.  दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे हवामान अधिक दमट वाटत असून हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Published on: Jul 21, 2025 09:29 AM