अंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराही पेडणेकर यांनी भाजपला दिलाय.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराही पेडणेकर यांनी भाजपला दिलाय. | Mumbai Mayor Kishori Pednekar warn BJP over protest on matoshree on Ram Temple