मोठी बातमी! विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, नेमकं कारण काय? बघा VIDEO
मुंबईतील विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या स्कॅनिंग मशिनमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. बघा व्हिडीओ
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. विधानभवनातील ज्या ठिकाणाहून अभ्यागतांना सोडले जाते त्याच प्रवेशद्वारावर ही आग लागल्याची माहिती मिळतेय. ही आग लागताच सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे काही जवान घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
Published on: May 19, 2025 03:15 PM
Latest Videos