Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
सीसीटीव्ही विश्लेषण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींचा पाठलाग केला. सुरतमार्गे पुणे-जयपूर एक्सप्रेसने प्रवास करत असताना, कोटा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असून, पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.
मुंबईत घडलेल्या एका गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी नॉर्दर्न साईडला आणि त्यानंतर सुरतच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. सुरतमधून पुणे-जयपूर एक्सप्रेसने ते पुढे निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्या ट्रेनच्या विशिष्ट बोगीची अचूक माहिती मिळवली आणि तात्काळ कोटा पोलिसांशी संपर्क साधला. या अचूक माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी आरोपींना तिथेच ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांचे पथक त्यांचा पाठलाग करत होते आणि काही तासांच्या अंतराने कोटा येथे पोहोचले.
या कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न (अटेम्ट टू मर्डर) आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) आणि खंडणी विरोधी पथक करत आहे. घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर झाले असून, दोन शस्त्रांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, कोटा पोलिसांनी शस्त्रे सापडली नसल्याचे म्हटले आहे.
