Mumbai Rain Update : मुंबईकरांनो जरा जपून… पुढील 3 तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा काय?
गरज असल्यास घराबाहेर पडा. कोणतीही अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आलंय.
गेल्या तासाभरापासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील लोअर परळ, दादर, वरळी, चर्चगेट, सायन, कुर्ला, घाटकोपर या भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळतोय. अशातच पुढील तीन तास मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात हवामान खात्याकडून मुंबईकरांसाठी तीन तास धोक्याचे असल्याचा इशाराही देण्यात आलाय. तर पुढील तीन ते चार तासात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार ते अतिशय तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढील तीन तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आल्याने मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला मुंबई महापालिकेकडून देण्यात आलाय.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

