Monsoon Update | मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची ग्रँड एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना मोठा दिलासा

Monsoon Update | मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची ग्रँड एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना मोठा दिलासा

| Updated on: Jun 03, 2026 | 10:01 AM

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच मुंबईत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असून शहरातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच मुंबईत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असून शहरातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णता आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक ढग दाटून आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शहरातील तापमानातही काही प्रमाणात घट झाली आहे.

दरम्यान, दादर, प्रभादेवी, लालबाग आणि कुर्ला परिसरातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली. कुर्ला परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईबरोबरच पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातही वातावरण आल्हाददायक झाले आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला असून पुढील काही दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Published on: Jun 03, 2026 10:01 AM
Follow Us