मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मुंबईवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित पोस्टमध्ये 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा कालावधी अत्यंत धोकादायक असल्याचा उल्लेख करण्यात आला असून, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. पोस्टमधील दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू असून, त्यामागील स्रोत आणि पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोधही घेतला जात आहे.
दरम्यान, संभाव्य सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, शहरातील संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या व्हायरल पोस्टमधील दाव्याला अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.