BMC | मुंबई प्रभाग समिती निवडणूकीत ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार? 5 मार्चला अध्यक्षांची निवड

BMC | मुंबई प्रभाग समिती निवडणूकीत ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार? 5 मार्चला अध्यक्षांची निवड

| Updated on: Feb 23, 2026 | 10:59 AM

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मनसेच्या पाठिंब्याच्या जोरावर अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे अध्यक्ष बसवण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
मनसेच्या पाठिंब्याच्या जोरावर अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे अध्यक्ष बसवण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेचा पाठिंबा निश्चित करण्यासाठी ठाकरे गटाकडून मनसे नेत्यांसोबत चर्चा सुरू असून, त्याचबरोबर काँग्रेसशीही बोलणी सुरू असल्याचे समजते. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास मनसेलाही काही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या युतीमुळे प्रभाग समित्यांच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांची निवड 5 मार्च रोजी होणार आहे. .

Published on: Feb 23, 2026 10:59 AM