Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो आजपण उडणार धांदल कारण… हवामान खात्याचा राज्याला अलर्ट काय?
ऑक्टोबर हिटनंतर मुंबईत आज संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सायंकाळी पाऊस पडत असून, बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत ऑक्टोबर हिटनंतर आज संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाने (IMD) आता अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, या अनपेक्षित पावसामुळे देशभरात आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या दिवाळी सणावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सायंकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण तयार होत असून, जोरदार सरी कोसळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह अन्य भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सायंकाळच्या सुमारास मुंबईत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ही माहिती टीव्ही ९ मराठीसाठी अमित शिगवण आणि निखिल चव्हाण यांनी दिली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

