Nagpur News : हेल्मेट का नाही घातलं? तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
Nagpur Viral Video : तरुणाने वाहतूक नियमांची आठवण करून दिली म्हणून पोलिसाने त्याला शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.
तरुणाने वाहतूक नियमांची आठवण करून दिली म्हणून पोलिसाने चक्क तरुणाच्या कानशिलात लगावली आहे. बाईक चालवताना हेल्मेट का घातलं नाही? असं या तरुणाने पोलिसांना विचारलं. त्यावर राग अनावर होऊन या पोलिसाने तरुणाला कानशिलात लगावली. इतकंच नाही तर या पोलिसाकडून तरुणाला शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, दात दुखत असल्याने हेल्मेट घातलं नसल्याचं या पोलीसाचं म्हणण आहे. हा संपूर्ण प्रकार नागपूरमध्ये घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
Published on: Apr 11, 2025 09:46 AM
Latest Videos

