
देवाभाऊ पब्लिकमध्ये… थेट बाईकवरून साधला संवाद… तुफान तुफान गर्दी
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, सर्व पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. नागपुरात भाजपने भव्य बाईक रॅली काढली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवून सहभागी झाले. 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षांकडून आणि उमेदवारांकडून मोठ्याप्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. नागपूर शहरातही भाजपकडून प्रचार रॅली काढण्यात आली असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती बघायला मिळाली आहे. यावेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी बाईक चालवून या रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला बघायला मिळाला.
येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी (मुंबईसह) एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. दरम्यान, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार थांबणार असल्याने, नेते आणि उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या टप्प्यात आक्रमक प्रचार करत आहेत. अखेरच्या दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचारसभा होणार आहे. तसेच नागपूरमध्ये बाईक रॅली निघणार असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.