Ashish Jaiswal | शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकल्या फाईल्स, भ्रष्टाचाराचा आरोप

शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी नागपूर कृषी विभागाच्या आत्मा योजनेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेत शेतकऱ्यांना शेती साहित्यासाठी तब्बल तीनपट जास्त किंमत लावली आणि त्या बदल्यात निकृष्ट कृषी साहित्य पुरवठा केला, असा आरोप आशिष जैसवाल यांनी केलाय.

शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी नागपूर कृषी विभागाच्या आत्मा योजनेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेत शेतकऱ्यांना शेती साहित्यासाठी तब्बल तीनपट जास्त किंमत लावली आणि त्या बदल्यात निकृष्ट कृषी साहित्य पुरवठा केला, असा आरोप आशिष जैसवाल यांनी केलाय. यावर संतापलेल्या आमदार जैसवाल यांनी या योजनेशी संबंधित पाईल कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकत जाब विचारलाय.

नागपूरमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप झालाय. खुल्या बाजारात ज्या कृषी औषध पंपाची किंमत 1800 रुपये आहे तो पंप कृषी विभागाने 6 हजार 500 रुपयांना दिलाय. बाजारात 6 हजार रुपयांना मिळणाऱ्या डिझेल पंपची किंमत 19 हजार रुपये लावलीय. एकूणच अव्वाच्या सव्वा किमती लावून शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य देण्यात आलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI