नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांकडे न पाहता सर्वांची विचारपूस केली

शरद पवार यांच्या बारामतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. काकांचा पक्ष पुतणे अजितदादा यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर फोडल्यानंतर आता येथे लोकसभेत पवार विरुध्द पवार असा सामना होणार आहे. पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेत उभ्या राहणार आहेत. त्यामुळे व्यासपीठावर मोठा फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला आहे.

नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांकडे न पाहता सर्वांची विचारपूस केली
| Updated on: Mar 02, 2024 | 1:12 PM

बारामती | 2 मार्च 2024 : बारामतीत लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठा फॅमिली ड्रामा घडत आहे. काका शरद पवारांचा पक्षच पुतणे अजित पवार यांनी पळविल्याने पवार कुटुंबात फाळणी झाली आहे. भाजपाने त्यासाठी रसद पुरविल्यानंतर आता लोकसभेत एकाच घरातीस नणंद-भावजयीत निवडणूकांचा बार उडणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामतीत सरकारने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात या मेळाव्यात शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मला केंद्राकडून आमंत्रण मिळाल्याचे मिडीया प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे. शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात हा कार्यक्रम होत असून या निमित्ताने शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेवणाचे आमंत्रण दिल्याचे पत्रही व्हायरल झाले होते. याच पत्रात दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही आमंत्रण देण्यात आले होते, अर्था हे आमंत्रण स्वीकारले नसल्याचे म्हटले जात आहे. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. परंतू आपले बंधू अजितदादांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दृश्य सर्वांना पाहायला मिळाले. दादांनी राष्ट्रवादी पक्ष बळकविल्यानंतर त्यांची बहिण सुप्रिया सुळे हिच्या विरोधात बारामतीत सुनेत्रा पवार यांना उतरविण्याचाही निर्णय घेतल्याने नात्यात अंतर निर्माण झाल्याचे स्पष्ट पाहायला मिळाले.

Follow us
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार.
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा.
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा.