AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

| Updated on: Jun 12, 2026 | 10:08 AM
Share

राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत चर्चांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीला बोलावल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, पटोले यांनी आपण पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडूनही काँग्रेससोबत येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांच्याकडून विचारमंथन सुरू असल्याचे पटोले यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने कोणत्याही पक्षाला विलिनीकरणाची अधिकृत ऑफर दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या विषयावर महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 12, 2026 10:08 AM

Follow Us