Marathi News » Videos » Narayan Rane Arrest and Bail Video of mistakes in Union Minister Narayan Rane's speech goes viral, Rane troll
Special Report | शब्दांच्या गोंधळात राणे सुद्धा कसे अडकले ?
स्वातंत्र्याचं हीरक महोत्सवी वर्ष की अमृत महोत्सवी वर्ष यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीसे गडबडले. तेव्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांना नेमकी माहिती दिली. त्यावरुन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि राज्यात मोठी खळबळ उडाली. नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. त्यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली. मात्र, राणेंचं ते वक्तव्य आणि अटक यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र उभं राहिलं. अशावेळी नारायण राणे यांचेही काही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्वातंत्र्याचं हीरक महोत्सवी वर्ष की अमृत महोत्सवी वर्ष यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीसे गडबडले. तेव्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांना नेमकी माहिती दिली. त्यावरुन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि राज्यात मोठी खळबळ उडाली. नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. त्यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली. मात्र, राणेंचं ते वक्तव्य आणि अटक यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र उभं राहिलं. अशावेळी नारायण राणे यांचेही काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात नारायण राणेही बोलताना गडबडल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन नारायण राणेंना आता ट्रोल केलं जात आहे. पाहूया याबाबतचा खास रिपोर्ट