Nashik IT Company | धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थातून द्यायचे गुंगीचे औषध, अन्…
नाशिकच्या आयटी कंपनीतील एका विशिष्ट धार्मिक गटाकडून महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रकरणाने देश हादरला. या प्रकरणातील महिला सूत्रधार निदा खान हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असून यानंतरच प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

अलीकडील एका माहितीनुसार, महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्यांना गोड पदार्थातून गुंगीचे औषध दिले जात होते. नाशिक येथील प्रकरणात पीडितांना गुंगीकारक औषध दिल्याचा दाट संशय यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिरखुर्मासारख्या गोड पदार्थातून या पीडितांना आरोपींनी नशेचा पदार्थ दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. मैत्री झाल्यानंतर या महिलांना शीरखुर्मा देण्यात आला. त्यात नशेचे पदार्थ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या खुलाशाने आता खळबळ उडाली आहे.
Published on: May 03, 2026 11:29 AM
Follow Us