महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते…
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात बंडखोरी करणारे गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांपासून मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. काल मंत्री दादा भूसे यांनीही चर्चांमध्ये सहभाग घेतला. तिन्ही वरिष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळाले असून प्रसाद हिरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
मात्र गोकुळ गिते अजूनही निवडणुकीच्या मैदानात ठाम असल्याचे दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भूसे यांनी गोकुळ गिते यांच्यासोबत चर्चा केली. यावर महाजन महाजन म्हणाले, आज नक्कीच गुडन्युज मिळणार सकारात्मक चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, असे दिसून आले आहे. गोकुळ गिते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आज नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी गणेश गिते यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.