भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!

भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!

| Updated on: Jun 04, 2026 | 4:05 PM

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे, अशात महायुतीमध्ये नेत्यांच नाराजीनाट्य सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे.

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे, अशात महायुतीमध्ये नेत्यांच नाराजीनाट्य सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजपच्या महायुतीतील उमेदवारांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत होते. यापैकी अनेक नेत्यांची बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलं आहे. इतकेच नाही तर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही माघार घेतल्याचं चित्र आहे.

दरम्यान, बंडखोरीच्याबाबत नाशिक विधान परिषदेची जागादेखील चर्चेत होती. आता पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीच्या चर्चांमध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. मात्र दुसरीकडे त्यांचे बंधू गोकूळ गीते यांनी माघार घेण्यास थेट नकार दिला आहे. या जागेसाठी अधिकृत उमेदवारी मिळालेल्या नरेंद्र दराडे यांच्या मुलाने बाप काढला, म्हणून आता गोकूळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पुढे या रणधुमाळीत नेमकं काय काय घडेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे.

Published on: Jun 04, 2026 3:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us