Nashik Gangapur Dam | पाणीपातळी वाढल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु असून गंगापूर धरण क्षेत्रात देखील पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरणात सध्या सुमारे 70 टक्के पाणीसाठा आहे. तर धरणाच्या पाणीपातळी वाढल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु असून गंगापूर धरण क्षेत्रात देखील पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरणात सध्या सुमारे 70 टक्के पाणीसाठा आहे. तर धरणाच्या पाणीपातळी वाढल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात 75 टक्के पाणी साठा झाल्यानंतर शहरातील पाणी कपातीचा निर्णय रद्द होऊ शकतो. यामुळे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे समाधानाचं वातावरण आहे.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

