Nashik News : ठाकरेंच्या सेनेत सर्वात मोठं बंड होणार? राऊतांचे राईट हँड साथ सोडणार
ShivSena Nashik rebellion : नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला गळती लागलेली आहे. त्यातच आता संजय राऊत यांचे राईट हँड समजले जाणारे नेते देखील बंड करणार असल्याचं समोर येत आहे.
नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे राइट हँड समजले जाणारे सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज आहेत. मी आणि इतर १० ते १२ लोक नाराज आहोत असं बडगुजर यांनी म्हंटलं आहे. पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, असा आरोप देखील बडगुजर यांनी केला आहे.
दरम्यान, कालच बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांची भेट देखील घेतली होती. विशेष म्हणजे कालच खासदार संजय राऊत देखील नाशिक दौऱ्यावर होते. असं असूनही बडगुजर यांनी राऊतांच्या एवजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर विलास शिंदे हे देखील पक्षात नाराज असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं. विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

