संजय राऊत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार; काय कारण?
Sanjay Raut Meet to Satyapal Malik Meeting : राजधानी दिल्लीत आज संजय राऊत- सत्यपाल मलिक यांची भेट, पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे नेते आणि खासदार संजय राऊत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत. आज राजधानी दिल्लीत संजय राऊत- सत्यपाल मलिक यांची भेट होणार आहे. दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती आहे. सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या एका मुलाखतीची सध्या देशात चर्चा होतेय. पुलवमा हल्ला ते जम्मू काश्मीरामधील 370 कलम हटवणे, शासकीय कर्मचाऱ्यांचे विमा कंत्राट देण्यासाठी रिलायन्सने देऊ केलेल्या लाचेचं प्रकरण, वादग्रस्त शेतकरी कायदे, गोव्यातील राजकीय भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर व्यक्त केलेल्या मतांमुळे सत्यपाल मलिक हे सध्या देशात चर्चेचा विषय ठरले आहेत. अशात ही भेट होतेय. या भेटीदरम्यान संजय राऊत सत्यपाल मलिक यांना मुंबई दौऱ्याचं आमंत्रण देणार आहेत. मुंबई भेटीत सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक आणि संजय राऊत भेटीला विशेष महत्व आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

