नालायकांच्या हातात नवी मुंबई मनपा गेल्यास… गणेश नाईकांचा नाव न घेता श्रीकांत शिंदेंवर निशाणा
गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका "नालायकांच्या" हाती गेल्यास शहराचे वाटोळे होईल असा इशारा दिला आहे. त्यांनी 14 गावे नवी मुंबईच्या हद्दीत नकोत अशी भूमिका मांडली.
गणेश नाईक यांनी नुकतीच नवी मुंबई महापालिकेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर नालायक नसलेल्यांच्या हातामध्ये नवी मुंबई पालिका गेली, तर या शहराचे वाटोळे होईल, असं वक्तव्य करत गणेश नाईकांनी नाव न घेता श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
गणेश नाईकांनी 14 गावे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये नकोत अशी मागणी केली. ते म्हणाले की, कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का टाकावा? निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांत ही गावे बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपली पुण्याई पणाला लावतील, असेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील जनता नालायक लोकांच्या हातात सत्ता देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

