नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ओबीसी मंत्र्यांची मुले आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात जातात, असे वाघमारे यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा […]
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ओबीसी मंत्र्यांची मुले आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात जातात, असे वाघमारे यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा दिला आहे. तसेच, मराठा आरक्षण आंदोलक आणि वकील योगेश केदार यांनीही वाघमारे यांनी मोठी चूक केल्याचे म्हटले आहे. यापुढे वाघमारेला जो कोणी मारामारी करेल, त्याची केस फुकट लढणार असल्याचे केदार यांनी जाहीर केले. जालन्यात सुवर्णा राऊत यांच्या फिर्यादीवरून नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही वाघमारे यांच्या वक्तव्यावर टीका करत, त्यांनी मराठा महिलांबद्दल बोलणे बंद करावे, असे बजावले. नांदेड जिल्ह्यात मराठा महिलांनी वाघमारे यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला आहे.
