Tanaji Sawant on NCP | कार्यालयावर दगडफेक करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्तं, भविष्यात त्यांना त्यांचे स्थान कळेल, आमदार सावंत यांचा इशारा

Tanaji Sawant on NCP | आपल्या कार्यालयावर दगडफेक करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्तं असल्याचा गौफ्यस्फोट आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 02, 2022 | 2:19 PM

Tanaji Sawant on NCP | आपल्या कार्यालयावर दगडफेक करणारे राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्तं असल्याचा गौफ्यस्फोट आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे. शिंदे गटाला (Shinde Group) पाठिंबा जाहीर केल्यानंतर आमदार तानाजी सावंत हे गुवाहाटी येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे कार्यालय फोडण्यात आले होते.  दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली होती.  कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. आता त्यामुळेच मुख्यमंत्री त्यांना भेटायला तर येत नाही ना? असा प्रश्न विचारला असता, कार्यालय फोडणारे शिवसैनिक नव्हते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा गंभीर आरोप सावंत यांनी लावला आहे. भगवे रुमाल टाकून राष्ट्रवादीच्याच लोकांनी आपले कार्यालय फोडल्याचा गौप्यस्फोट सावंत यांनी यावेळी केला. सध्या राज्यात आमचं सरकार आहे, ज्यांनी हा प्रकार केला. त्यांना भविष्यात त्यांचे स्थान कळेल असा इशारा ही द्यायला ते विसरले नाहीत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ही यावेळी खरमरीत टीका केली. तर संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी भाष्य करणे यावेळी टाळलं. पक्ष प्रवक्ते हेच याविषयीची बाजू मांडतील असे त्यांनी यावेळी सांगत, प्रश्नांना बगल दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें