पवार कुटुंबात फूट? अजितदादा म्हणताय, पुन्हा एकत्र नाही, आमच्यात फाटलंय तर सुप्रिया ताई म्हणताय…
शरद पवार यांच्यासोबत एकत्र येऊ अशा शंका कुशंका ठेवू नका, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे आज न् उद्या काका पुतणे एकत्र येतील? या प्रश्नाला अजित पवार यांनी पूर्णविराम दिलाय. तर अजितदादांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या....
पुणे, ५ मार्च २०२४ : शरद पवार यांच्यासोबत एकत्र येऊ अशा शंका कुशंका ठेवू नका, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे आज न् उद्या काका पुतणे एकत्र येतील? या प्रश्नाला अजित पवार यांनी पूर्णविराम दिलाय. तर अजितदादांच्या या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत पवार कुटुंब एकत्र असल्याचे म्हटले आहे. वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही. लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे. माझे सगळ्यांशी मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहे. कुणाशीही माझे मनभेद नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला मतं मांडायचा अधिकार आणि मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाची स्टाईल असते. एनसीपी पक्षामध्ये अजूनही फूट नाही पवार कुटुंबातही नाहीच, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे म्हटले. तर कोणी कसं वागायचं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे. आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं खाजगी आयुष्य मिक्स करु शकतं नाही. एवढं वय आणि वैचारिक प्रगल्भता आमच्यात आली पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

