Amol Mitkari : ‘लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही’; नितेश राणेंना मिटकरींचा घरचा आहेर
Amol Mitkari On Nitesh Rane Statement : नितेश राणे यांनी काल माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यावर आता महायुतीच्या नेत्यांकडूनच त्यांना विचार करून बोलण्याचा सल्ला दिला जात आहे.
ते लाडके असले तरी काहीही बोलायची सूट मुख्यमंत्री देणार नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी आज नितेश राणे यांना लगावला आहे. काल पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ‘मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे, ते मला काय बोलणार?’ असं म्हंटलं होतं. त्यावर आता त्यांना त्यांच्यात युतीच्या नेत्याकडून घरचा आहेर मिळालेला दिसत आहे.
यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, कालच माध्यमांनी दाखवलं होतं की त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे. पण ते म्हणत असतील की ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत तर आपण ते मान्य करू. पण म्हणून लाडके असल्यावर तुम्ही काहीही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी जबाबदरीने बोललं पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचे दोन्ही कान टोचले असतील असं मला वाटतं, असं मिटकरी यावेळी म्हणाले.
Published on: Mar 19, 2025 01:21 PM
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
