भाजप आक्रमक पण अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण; म्हणाले…

जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र त्यादरम्यान आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. राज्यभरात भाजपने आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तर जितेंद्र आव्हाडांवर महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

भाजप आक्रमक पण अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
| Updated on: May 30, 2024 | 4:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. परंतु त्यावेळी त्याच जागी जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोपही विरोधकांनी केला. त्यानंतर राज्यभरात भाजपने आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तर जितेंद्र आव्हाडांवर महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, अनावधानाने माझ्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला. चूक लक्षात येताच आव्हाडांनी बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेची माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. यासगळ्यामध्ये एकीकडे भाजप आक्रमक असताना अजित पवार गटातील बड्या नेत्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण कऱण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ‘जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले. त्यांची भावना होती की मनुस्मृतीचे दहन केली पाहिजे, त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि ते चित्र त्यांनी तेथे लोकांच्या समोर फाडलं. मात्र त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी केलेल्या कृतीबद्दल माफीसुद्धा मागितली.त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. आमचा विरोधक आहेत म्हणून टीका करण्यात अर्थ नाही, ‘ असे छगन भुजबळ म्हणाले.

Follow us
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.