Ajit Pawar CM Munde Meet : भुजबळांचा शपथविधी अन् रात्री मुंडेंना घेऊन दादा थेट फडणवीसांच्या घरी, राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडणार?
छगुन भुजबळांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अचानक काल रात्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर आले. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनासंदर्भात आता चर्चा झाली का? अशी खलबत पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
छगन भुजबळांचा मंगळवारी सकाळी दहा वाजता शपथविधी झाला आणि रात्री साडे दहा वाजता अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले. रात्री साडे दहा वाजता अजित पवार आणि धनंजय मुंडे वर्षा बंगल्यावर आले. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अजित पवार आणि मुंडेंमध्ये साधारणतः एक तास चर्चा झाली. बीडच्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता. मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांना मंत्रीपदाची संधी देत त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. पण आता धनंजय मुंडे नाराज असून त्यामुळेच दादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला घेऊन आल्याचं बोललं जात आहे. राजकीय पुनर्वसन करण्यासंदर्भात ही चर्चा झाली का? अशी खलबतंही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर धनंजय मुंडे प्रगल्भ नेते असून ते नाराज होणार नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबनकुळे म्हणाले. ज्या दिवशी छगन भुजबळांना मंत्री केलं त्याच दिवशी धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे आले. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का? हा ही सवाल आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

