Eknath Khadse : एक बटण दाबलं की देशात हाहाकार माजेल.. हनी ट्रॅप प्रकरणी एकनाथ खडसेंचा इशारा काय?
राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती असून नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असल्याची शंका व्यक्त केली जात असताना एकनाथ खडसेंनी खळबळ उडवून दिली आहे.
नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा सुरू असताना विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक पेन ड्राइव्ह दाखवला आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी खळबजनक आरोप केलाय. प्रफुल्ल लोढानं एक व्हिडीओ बनवला होता. त्यात अनेक तथ्य असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. एक बटण दाबलं की संपूर्ण देशात हाहाकार माजेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिलाय. इतकंच नाहीतर प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडीओ आहेत. त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली.
दरम्यान, प्रफुल्ल लोढा हा भाजपमध्ये असून तो गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जातो. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असून तो गिरीश महाजनांचा कार्यकर्ता आहे, असे सांगत असताना प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटकही करण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

