Ajit Pawar Video : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची पहिलीचं बैठक, त्यांच्यासमोरच दादा स्पष्टच म्हणाले, ‘…तर त्याची झळ पक्षाला लागते’
धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा काल दिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची ही पहिलीच बैठक होती.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येनंतर त्याच्या हत्येवेळचे काही विदारक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत. यानंतर राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा काल दिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला देत कानमंत्रच दिल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे किंवा आंधळेपणाने विश्वास टाकू नये, असे अजित पवारांनी सांगितले. पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका. कार्यकर्ते जर व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षाला लागते, असं अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना कानमंत्र दिला. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पहिल्या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या समोरच हे वक्तव्य केलं. अजित पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना धनंजय मुंडेंचे उदाहरण देत परावलंबी न होता स्वावलंबी व्हा, असा सल्ला दिल्यानंतर नेत्यासोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यासोबत पक्षाला देखील कशाप्रकारे बसते हे धनंजय मुंडे प्रकरणातून आपल्याला दिसून आले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.