Special Report | ‘2 लोग बेच रहे है..2 खरीद रहे है’..! OBC परिषदेत भुजबळांची फटकेबाजी

जळगावमध्ये पार पडलेल्या ओबीसी हक्क परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जो जो या कामात येत नाही त्यांच्या मागे इन्कम टॅक्स लावली जाते, ईडी लावली जाते. जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. म्हणून सर्वांनी सावध राहा आणि घाबरले असाल त्यांनी भाजपमध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

जळगावमध्ये पार पडलेल्या ओबीसी हक्क परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जो जो या कामात येत नाही त्यांच्या मागे इन्कम टॅक्स लावली जाते, ईडी लावली जाते. जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. म्हणून सर्वांनी सावध राहा आणि घाबरले असाल त्यांनी भाजपमध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. आज याठिकाणी सर्व जण अतिशय जोरात आणि तावातावात बोलले. उद्या इन्कम टॅक्स घरी आले नाही म्हणजे झालं.खडसेंनाही आज त्रास होतोय.सावध रहा बरं. जे घाबरले असतील त्यांनी भाजपमध्ये जावं. मग सब माफ होईल, असा घणाघात भुजबळ यांनी केलाय. यावेळी भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही हल्ला चढवला.

‘मी जेलमध्ये असताना कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला. माझी तब्येत बरी नसताना त्यांनी खूप मदत केली. ते विधानमंडळात उभे राहिले. आवाज उठवला. या माणसाचा मी शब्द मोडू शकत नाही. शरद पवारांनी देखील मला साथ दिली. त्यांनीही पत्र पाठवले होते. त्यामुळे मला उपचार मिळाले. भारत सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहेत. धर्मांची अफूची गोळी आज सर्वांवर राज्य करत आहे. मंडल बाहेर आले की लगेच कमंडल बाहेर येते’, असं छगन भुजबळ म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI