धनुष्यबाण हाताच्या नादी लागल्यापासून..,Jayant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्याने सभागृहात एकच हशा
राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचं झालं असं की या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) काहीसे उशिरा पोहोचले, त्यामुळे कार्यक्रमालाही काहीसा उशीर झाला. त्यावरुन जयंत पाटील यांनी वरील टिप्पणी केलीय.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे आपली भाषणशैली आणि विरोधकांना खोचक शब्दात प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखले जातात. आता सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचं झालं असं की या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) काहीसे उशिरा पोहोचले, त्यामुळे कार्यक्रमालाही काहीसा उशीर झाला. त्यावरुन जयंत पाटील यांनी वरील टिप्पणी केलीय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
