Parth Pawar Land Deal : पार्थ पवारांवर 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अजितदादांनी झटकले हात अन् म्हणाले…
पुण्यात पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, ज्यात ३०० कोटींना जमीन घेतल्याचा आणि २१ कोटी मुद्रांक शुल्क माफ केल्याचा समावेश आहे. यावर अजित पवारांनी मुलाच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करत माहिती घेणार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील महार वतनाच्या जमिनीवरून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. तब्बल १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना घेतल्याचा आणि २१ कोटींचे मुद्रांक शुल्क माफ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी अजित पवारांनी आपला या व्यवहाराशी कोणताही थेट किंवा दुरान्वयी संबंध नसल्याचे म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, सज्ञान झाल्यावर मुले त्यांचे व्यवहार स्वतःच करतात. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्याला माझा पाठिंबा नसेल. या प्रकरणात माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, तीन महिन्यांपूर्वीच पार्थला असे चुकीचे व्यवहार चालणार नाहीत, अशी ताकीद दिल्याचेही त्यांनी नमूद केले. या व्यवहारात मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

