Supriya Sule : मी 2 जुलैचा ‘तो’ क्षण कधीही विसरणार नाही… सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले?
२६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा २६ वा वर्धापन दिन आज पुण्यात साजरा केला जातोय. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी इच्छा बोलून दाखवत राजीनाम्याचे संकेत दिले. तर माझ्याकडे कोणतंच पद नसल्याची खंत व्यक्त करत रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या कार्यक्रमात बोलत असताना मी 2 जुलैचा ‘तो’ क्षण कधीही विसरणार नाही.. असं वक्तव्य केलं. ‘यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आपल्या आयुष्यातही आलं. दोन जुलैचा तो क्षण मी कधीच विसरणार नाही. दोन जुलैला.. पुण्यातील पत्रकारांनी त्यावेळी विचारलं तुमचा पक्ष फुटला आता तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण? यावेळी शरद पवारांनी हात वर केला आणि म्हणाले शरद पवार..’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी तो क्षण सांगितला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

