AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या भूकंपानंतर राष्ट्रवादी हदरली, अध्यक्ष पदावरून नेत्यांमध्येच जुंपली; निवडीआधी नाराजीनाट्य सुरू

पवारांच्या भूकंपानंतर राष्ट्रवादी हदरली, अध्यक्ष पदावरून नेत्यांमध्येच जुंपली; निवडीआधी नाराजीनाट्य सुरू

| Updated on: May 04, 2023 | 7:42 AM
Share

पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू झालं आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पवार राजीनामा मागे घेतील की आपल्या निर्णयावर ठाम राहतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत (NCP) खळबळ उडाली आहे. तसेच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप (Political Earthquake) आला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू झालं आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पवार राजीनामा मागे घेतील की आपल्या निर्णयावर ठाम राहतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. राजीनामे सत्र थांबावेत आणि शरद पवार यांना विनंती करण्यासह काही बाबींवर चर्चाकरण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलविण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीत अध्यक्ष निवडीआधी नाराजीनाट्य? सुरू झाल्याचे उघड झाले. तर नक्की राष्ट्रवादीत घडतयं काय असा सवाल अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 04, 2023 07:42 AM